बाणेर :
आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी विशाल गांधिले मित्र परिवाराच्या वतीने शुक्रवार, दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी बाणेर येथील बंटारा भवन येथे महत्त्वाची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विशाल गांधिले यांचे निकटवर्तीय सहकारी व कोअर कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मोरेश्वर बालवडकर, प्रदीप रणपिसे, शैलेंद्र कदम, शिवराज थोरात, नेताजी खैरे, जितेंद्र शर्मा, रूपेश पाडाळे, सागर पाषाणकर, कोंडीबा साळवे, समीर सुतार, महेंद्र पाटील, शिवांजली कळमकर व सार्थक लोंढे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
बैठकीदरम्यान आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी प्रभावी निवडणूक यंत्रणा उभारणे, बूथस्तरीय नियोजन, कार्यकर्त्यांचे समन्वयित कामकाज तसेच संपूर्ण निवडणूक व्यवस्थापन कशा पद्धतीने राबवावे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या नियोजन बैठकीला बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी या सर्व भागांतील ८५० पेक्षा अधिक कार्यकर्ते व मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या उत्साहात उपस्थित होते. बैठकीतून कार्यकर्त्यांमध्ये आगामी निवडणुकीसाठी नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले