सोमेश्वरवाडी :
सोमेश्वरवाडी, पाषाण (पुणे) येथील श्री विठ्ठल–रुक्माई मंदिर ट्रस्ट तालीमच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मा. श्री. डॉ. दिलीप भाऊ मुरकुटे यांच्या वतीने ₹५१,०००/- इतकी देणगी देण्यात आली.
या प्रसंगी ह. भ. प. सोनबा उमाजी काकडे, ह. भ. प. बळवंत तुकाराम निम्हण, ह. भ. प. शंकर जयसिंग घोलप, ह. भ. प. पांडुरंग शंकर जाधव यांच्यासह श्री भरत जोरे, श्री संतोष आरगडे, अविनाश गायकवाड, जीवन खेडेकर, ज्ञानेश्वर थोरात, ऋषी कांबळे, अशितोष पाटील, कुणाल कुंजीर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे भाविकांसाठी अधिक सुयोग्य व भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून या कार्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मंदिर ट्रस्टच्या वतीने मा. डॉ. दिलीप भाऊ मुरकुटे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी