सुतारवाडी :
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या पुणे शहर मा. युवती अध्यक्षा सुषमा संदीप बालवडकर यांनी सुतारवाडी परिसरात नागरिकांशी भेटीगाठी घेत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला.
या भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत दैनंदिन अडचणी, सुविधा, विकासकामे आणि अपेक्षा जाणून घेतल्या. नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, विश्वास आणि आपुलकीने भविष्यात अधिक वेगाने विकास साधण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे सुषमा बालवडकर यांनी स्पष्ट केले.
सुतारवाडी तसेच प्रभाग क्रमांक ९ च्या सर्वांगीण प्रगतीसाठी पारदर्शक, जनाभिमुख आणि विकासकेंद्रित कार्यपद्धतीने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी