सूस :
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री. प्रकाश तात्या बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सुस गावातून भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक ९ च्या प्रचाराला भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली.
या प्रचार प्रारंभ प्रसंगी पक्षाचे सर्व इच्छुक उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुस गावातील नागरिकांशी बंधुभावाने भेटीगाठी घेत संवाद साधण्यात आला. यावेळी नागरिकांनी आपल्या अपेक्षा, प्रश्न व सूचनांचा मोकळेपणाने आढावा मांडला.
जनतेचा विश्वास, प्रेम आणि पाठबळ हेच आपली खरी ताकद असून त्याच बळावर सर्वांगीण विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन हा प्रचार अधिक जोमाने आणि प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
प्रभागातील पायाभूत सुविधा, नागरिकांच्या दैनंदिन समस्या आणि भविष्यातील विकासकामांना प्राधान्य देत भारतीय जनता पार्टी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी