पाषाण :
पाषाण (प्रभाग क्र. ०९) येथे “संवाद आपुलकीचा” या उपक्रमांतर्गत मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी संवाद दौऱ्याची सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडलचे सरचिटणीस सचिन दळवी आणि भाजपा नेत्या लक्ष्मी सचिन दळवी यांच्या वतीने राबविण्यात आला.
या संवाद दौऱ्यादरम्यान घरोघरी जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. परिसरातील नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासासंबंधी सूचना ऐकून घेण्यात आल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपली मते मांडली.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश मतदारांशी आपुलकीचा संवाद वाढवणे, त्यांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष माहिती घेणे आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेणे हा आहे. नागरिकांनीही या संवाद दौऱ्याला सकारात्मक प्रतिसाद देत आपले प्रश्न मोकळेपणाने मांडले.
“संवाद आपुलकीचा” या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यातील थेट संवाद अधिक दृढ होईल, तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी