बाणेर :
बाणेर येथे मुरकुटे परिवाराच्या वतीने आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसे नेते अनिकेत मुरकुटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्यध्यक्ष जयेश मुरकुटे यांना पूर्ण ताकदीनिशी साथ देत निवडून आणण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या निर्णयासाठी मुरकुटे परिवारातील ज्येष्ठांपासून ते तरुण पिढीपर्यंत सर्व सदस्य एकत्र आले होते. सखोल चर्चा, विचारमंथन आणि परस्पर मतैक्याच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला. बाणेर परिसराच्या विकासासाठी आणि स्थानिक प्रश्नांना प्रभावी नेतृत्व मिळावे, या उद्देशाने हा एकत्रित निर्णय झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुरकुटे परिवाराने घेतलेला हा एकमताचा निर्णय आगामी निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी