बाणेर :
बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत होती. नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा मोठा परिणाम होत होता.
ही अडचण ओळखून अमोल बालवडकर फाउंडेशनतर्फे प्रभागातील प्रमुख चौकांवर, गर्दीच्या ठिकाणी आणि वर्दळीच्या मार्गांवर प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डन्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे वाहतुकीत शिस्त निर्माण होत असून वाहनांचा प्रवास अधिक सुरळीत व सुरक्षित बनला आहे. परिणामी नागरिकांचा मौल्यवान वेळ वाचत असून शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळत आहे.
सुव्यवस्थित, सुरक्षित आणि सुसंस्कारित शहर घडवण्याच्या उद्देशाने ही सेवा सातत्याने आणि प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थेमार्फत देण्यात आली आहे.
या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत असून वाहतूक व्यवस्थापनात नव्या पद्धतीचा सकारात्मक बदल घडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी