बाणेर :
बाणेर येथील मुरकुटे परिवाराच्या वतीने येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा कार्याध्यक्ष जयेश मुरकुटे यांना पूर्ण ताकदीने साथ देत निवडून आणण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
मुरकुटे परिवारातील ज्येष्ठ व युवक अशा सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सखोल चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. स्थानिक विकास, पारदर्शक कार्यपद्धती आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करणाऱ्या जयेश मुरकुटे यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
या निर्णयामुळे बाणेर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला बळकटी मिळणार असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत जयेश मुरकुटे यांच्या विजयासाठी मुरकुटे परिवार सक्रियपणे काम करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी