पाषाण :
भाजपा प्रभाग क्रमांक ९ च्या इच्छुक उमेदवार भाजपा नेत्या प्रियांका विनायक चिव्हे यांनी पाषाण सोमेश्वरवाडी परिसरात दौरा करत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या संवादादरम्यान नागरिकांच्या विविध अडचणी, अपेक्षा आणि क्षेत्रातील विकासासंदर्भातील आवश्यक बाबींची माहिती घेतली.
उच्च शिक्षित उमेदवार म्हणून प्रियांका चिव्हे यांनी नागरिकांमध्ये विशिष्ट ओळख निर्माण केली. त्यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या संकल्पना नागरिकांसमोर मांडत भविष्यातील कामकाजाचा आराखडा सादर केला. क्षेत्रातील पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, रस्ते विकास, स्वच्छता व्यवस्थापन आदी समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली.
महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी निर्माण करणे आणि प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी आश्वासन दिले. नागरिकांनीही आपल्या समस्या व अपेक्षा मांडत प्रभागाच्या प्रगतीसाठी योग्य नेतृत्वाची गरज असल्याचे नमूद केले.
या भेटीदरम्यान प्रियांका चिव्हे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विश्वासाचे नाते दृढ केले असून पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.




More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी