सुस :
सुस परिसरातील तिर्थ अविला सोसायटी ते जोशी वडेवाले या अत्यंत महत्त्वाच्या बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागात व आनंदी वातावरणात पार पडला. अवघ्या चार ते पाच दिवसांपूर्वी नागरिकांनी मांडलेली मागणी माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी तात्काळ पूर्ण केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या नव्या बाह्यवळण रस्त्यामुळे तिर्थ अविला, किरण शुभंकरोती, किरण संकल्प, ऑक्सफर्ड पॅराडाईज, शांती टेरेस, रेलिकॉन एलन प्रशांत, तिर्थ आरोही आदी सोसायट्यांमधील रहिवाशांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी या रस्त्याची अवस्था अतिशय खराब असून विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आज हा रस्ता सुरू होताच नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदच या कामाची खरी पावती असल्याचे मत माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी व्यक्त केले.
या बाह्यवळण रस्त्यामुळे सुस परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षित व सुकर प्रवासासाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पायाभूत सुविधांमध्ये दर्जात्मकता राखून विकासकामे पूर्ण करणे व नागरिकांना सन्मानजनक जीवनमान उपलब्ध करून देणे हीच आपली आणि सहकाऱ्यांची प्रामाणिक भूमिका असल्याचे बाबूराव चांदेरे यांनी यावेळी सांगितले.
या लोकार्पण सोहळ्याला श्री राहुलदादा बालवडकर (उपाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर), श्री उत्तम ससार, सौ. रोहिणीताई चिमटे (मा. नगरसेविका – पुणे महानगरपालिका), सौ. अंजलीताई चांदेरे (मा. सरपंच – सुस), श्री समीर चांदेरे (अध्यक्ष – राष्ट्रवादी युवक काँग्रेस, पुणे शहर) यांच्यासह ग्रामस्थ व विविध सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!