बाणेर :
बाणेर परिसरात आज “कीर्तीशक्ती फाऊंडेशन” या सामाजिक संस्थेचा औपचारिक शुभारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक श्री. रवींद्रजी वंजारवडकर, राज्यसभा खासदार माननीय सौ. मेधाताई कुलकर्णी तसेच बाणेर मेडिकल असोसिएशनचे प्रमुख, प्रसिद्ध डॉ. राजेश देशपांडे उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या संस्थापक सौ. कल्याणी टोकेकर, श्री. ब्रिजेश राय आणि सौ. शिखा नीखरा यांनी कीर्तीशक्ती फाऊंडेशनच्या सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी कार्याच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
याच कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या व भाजप पदाधिकारी सौ. कल्याणी टोकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त “धान्य संकलन : गरजू विद्यार्थ्यांसाठी” हा उपक्रम राबविण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना सांभाळणाऱ्या सेवाभावी संस्थांना लोकसहभागातून धान्य स्वरूपात मदत करण्याच्या या उपक्रमाला बाणेर–बालेवाडी–पाषाण परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने धान्य दान करून या उपक्रमाचे कौतुक केले.
अशा सामाजिक उपक्रमांमुळे सेवाभावी संस्थांचे एकत्रीकरण होते तसेच त्यांच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल सौ. कल्याणी टोकेकर यांचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
यावेळी बोलताना राज्यसभा खासदार सौ. मेधाताई कुलकर्णी यांनी सांगितले की, कल्याणी ताईंनी तळागाळातील समाजकार्य सातत्याने केले असून विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजनही त्या करतात. राजकारण आणि समाजकारणात सक्रियपणे काम करताना अनेक संघर्षांना सामोरे जावे लागते, मात्र त्या संघर्षांतूनच व्यक्तिमत्त्व घडत जाते आणि प्रगती साधता येते, असा विचार त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास विविध स्तरांतील प्रतिष्ठित नागरिक, विद्यापीठ भागाचे संघ कार्यवाह, सहकार्यवाह, स्वयंसेवक तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माजी नगरसेवक श्री. अमोल भैय्या बालवडकर, माजी कोथरूड अध्यक्ष श्री. प्रकाश तात्या बालवडकर, माजी नगरसेविका सौ. अर्चनाताई मुसळे, काँग्रेस पक्षाचे श्री. जीवन चाकणकर, श्री. अमरजी लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) माजी नगरसेवक श्री. बाबुराव अप्पा चांदेरे, श्री. समीर चांदेरे, श्री. राहुलदादा बालवडकर, सौ. ज्योतिताई बालवडकर, भाजप कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष श्री. लहू बालवडकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे श्री. जयेश मुरकुटे, संजय ताम्हाणे, अनिकेत मुरकुटे, सुधाकर धनकुडे आदी मान्यवरांचा समावेश होता.
कीर्तीशक्ती फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमांची व्यापक चळवळ उभी राहील, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.




More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले