सूस :
सूस येथील तीर्थ अविला सोसायटीसमोरील रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काल रात्री पूर्ण करण्यात आले. अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या या रस्त्यामुळे परिसरातील नागरिक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता नव्याने डांबरीकरण झाल्याने या रस्त्याला नवझळाळी मिळाली असून आजूबाजूच्या अनेक सोसायट्यांना याचा थेट फायदा होणार आहे.
या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरुस्ती अत्यंत आवश्यक होती. सोसायट्यांमधील नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष बाबुरावजी चांदेरे साहेब यांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागले. परिणामी हा रस्ता आता सुस्थितीत आला असून परिसरातील जनजीवन दळणवळणाच्या दृष्टीने अधिक सुकर होणार आहे.
या रस्त्यामुळे शिवबा चौकात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्याने नागरिकांचा त्रास लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. तसेच विद्या व्हॅली रस्ता आणि महादेव नगर परिसरातील रहिवाशांनाही या कामामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!