February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ चा मानकरी मनीष रायते (इंदापूर) : मुळशीच्या आखाड्यात ऐतिहासिक जल्लोष!!!

घोटवडे :

मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने सलग १८व्या वर्षी आयोजित करण्यात आलेली भव्य *मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ मुळशी तालुक्यातील घोटवडे फाटा येथील सुंदरबन लॉनजवळ मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाली*. या स्पर्धेने मुळशी तालुक्यातील कुस्तीप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण केले असून संपूर्ण परिसर कुस्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नामांकित तसेच उदयोन्मुख मल्लांनी सहभाग घेतला. मातीच्या आखाड्यात मल्लांनी दाखवलेली ताकद, चपळाई, तांत्रिक कौशल्य व डावपेच पाहण्यासाठी हजारो कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. प्राथमिक फेऱ्यांपासून अंतिम लढतींपर्यंत प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा ठरला.

स्पर्धेतील अंतिम लढती विशेष आकर्षण ठरल्या. *मुळशी केसरी २०२५ चा मानकरी मनीष रायते (इंदापूर) ठरला*. अंतिम सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन करत त्याने विजेतेपदावर आपले नाव कोरले. *सागर देवकाते (इंदापूर) याने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले*. *अविनाश गावडे (इंदापूर) तृतीय तर अभिजित भोईर (मुळशी) चतुर्थ क्रमांकावर राहिला*.

तसेच या स्पर्धेत *अमृता केसरीचा मानकरी भारत मदने (बारामती) ठरला,* तर *मुन्ना झुंजुरके (मुळशी) याने उपविजेतेपद पटकावले*. या थरारक लढतींनी आखाड्यातील वातावरण कमालीचे रंगले.

स्पर्धेत विविध वजनगटांमध्ये झालेल्या लढतींनाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

*५७ किलो वजनगटात* स्वप्निल शेलार (बारामती) प्रथम, अथर्व गोळे (पिरंगूट) द्वितीय, ओम गायकवाड (हवेली) तृतीय तर श्रेयस तनपुरे (हवेली) चतुर्थ क्रमांकावर राहिला.

*६१ किलो वजनगटात* शिवराज पायगुडे (आगळांबे) प्रथम, ओंकार ताठे (भोर) द्वितीय, अभिषेक लिम्हण (वेल्हा) तृतीय तर व्यंकटेश देशमुख (भूगाव) चतुर्थ क्रमांकावर राहिला.

*६५ किलो वजनगटात* अमोल वालगुडे (वेल्हा) प्रथम, युवराज सातकर (मावळ) द्वितीय, उदयसिंह मोरे (कात्रज) तृतीय तर शिवम महाले (मुळशी) चतुर्थ क्रमांकावर राहिला.

*७० किलो वजनगटात* योगेश्वर तापकीर (हवेली) प्रथम, अभिजित शेडगे (वेल्हा) द्वितीय, श्रीकृष्ण राऊत (राजगड) तृतीय तर कौशल हुलावले (मुळशी) चतुर्थ क्रमांकावर राहिला.

*७४ किलो वजनगटात* नामदेव कोकाटे (इंदापूर) प्रथम, शुभम जाधव (दौंड) द्वितीय, विपुल थोरात (इंदापूर) तृतीय तर चैतन्य पिंगळे (मुळशी) चतुर्थ क्रमांकावर राहिला.

यावेळी मुळशी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना *“मुळशीरत्न पुरस्कार २०२५” प्रदान करून सन्मानित करण्यात आले*. यामध्ये *सुमित–सुनीता कैलास दाभाडे, दर्शन दत्तात्रय काळभोर तसेच पै. पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ* यांचा मानकरी म्हणून गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी विशेष अभिनंदन केले.

तसेच *विद्यमान आमदार श्री शंकरभाऊ मांडेकर* यांचा मुळशी केसरी च्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या मल्लांना आकर्षक रोख बक्षिसे, चषक, मानचिन्हे व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नवोदित मल्लांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

या भव्य कार्यक्रमास आमदार शंकर मांडेकर, सह. पोलीस आयुक्त मनोज पाटील, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, हिंद केसरी अमोल चडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये अमित कंधारे, महादेव कोंढरे, शांताराम इंगवले, राजेंद्र डबडे, दगडू काका करंजावणे, दिलीप वेडे पाटील, नगरसेवक बंडू केमसे, मधुर दाभाडे, कुणाल वेडे पाटील, राजाभाऊ वाघ, सचिन खैरे, रामभाऊ गायकवाड, छबुनाथ बेरड, संजय पन्हाळकर, राजाभाऊ इंगवले, सुरेश हुलावळे, मिलिंद वाळुंज, संतोष देशमुख, गोविंद उचगे, युवा नेते सचिन आंग्रे, भानुदास पानसरे, राहुल पवळे, बबनराव दगडे (पो. पाटील), भरत वांजळे, सुनील बांदल, रमेश पवळे, नाना शिंदे, सूर्यकांत भुंडे, बाबुजी वाळंज, धनंजय दगडे, वैभव मुरकुटे, संदीप ढमढेरे, योगेश सोनवणे आदी मान्यवरांचा समावेश होता.*

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कुस्ती ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असून ग्रामीण भागातील तरुण मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्पर्धा अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी *मुळशी केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र बांदल, संस्थापक भास्कर मोहोळ, दत्ता काळभोर, सचिन मोहोळ*, सर्व संयोजन समिती, कुस्तीप्रेमी तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आखाडा व्यवस्थापन आणि प्रेक्षकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांमुळे ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली.

कुस्ती परंपरा जपणे, ग्रामीण खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे आणि नव्या पिढीला या खेळाकडे आकर्षित करणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ ही तालुक्यासाठी अभिमानास्पद व संस्मरणीय ठरली.