September 21, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

लहू बालवडकर यांचा सुस गाव भेट दौरा : नागरिकांच्या विश्वासातून विकासाचा निर्धार अधिक दृढ

सुस :

प्रभाग क्रमांक ९ मधील सुस गावात सुरू असलेल्या भाजपा कोथरूड विधानसभा उत्तर मंडल अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांच्या गाव भेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दौऱ्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी सुस गावात हा दौरा अत्यंत उत्साही, सकारात्मक आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.

दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी काळ भैरवनाथ मंदिराच्या दर्शनाने सुरुवात झाली. दर्शनानंतर सुस ग्रामस्थ, ज्येष्ठ मंडळी, सहकारी व मित्रपरिवाराने केलेले आत्मीय स्वागत हे गावकऱ्यांच्या विश्वासाचे व जिव्हाळ्याचे प्रतीक ठरले. या भेटीतून सुस गावाशी असलेले नाते अधिक घट्ट झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

गाव भेटीदरम्यान प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत त्यांच्या अडचणी, अपेक्षा व तातडीच्या प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. तसेच तरुणांशी विकास, पायाभूत सुविधा, रोजगार संधी आणि भविष्यातील उपक्रमांवर सकारात्मक व अर्थपूर्ण चर्चा करण्यात आली.

दौऱ्याच्या चौथ्या दिवशीही स्थानिक कुटुंबप्रमुख, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिलावर्ग व ग्रामस्थ यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, रोजगार संधी तसेच तरुणांच्या कौशल्य विकास या विषयांवर नागरिकांनी मांडलेल्या सूचनांनी पुढील विकासकामांची दिशा अधिक स्पष्ट झाली.

प्रभाग क्रमांक ९ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण पूर्णतः कटिबद्ध असल्याचे लहू बालवडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. हे नाते केवळ राजकीय नसून सामाजिक, भावनिक आणि विश्वासाच्या बंधावर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे पुढील कार्यासाठी अधिक ऊर्जा, जबाबदारी आणि दृढनिश्चय मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.

या गाव भेट दौऱ्यात सर्व कुटुंबप्रमुख, जिवाभावाचे सहकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या सहकार्याबद्दल व प्रेमाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

सुस गावातील हा गाव भेट दौरा अत्यंत यशस्वी ठरला असून, आगामी काळात तो अधिक व्यापक स्वरूपात सातत्याने सुरू राहील. प्रत्येक नागरिकाचा प्रश्न ऐकून त्याच्या निराकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

 

You may have missed