पाषाण :
पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस, म्हाळुंगे, बाणेर व बालेवाडी परिसरातील माता-भगिनींसाठी माजी नगरसेवक प्रमोद निम्हण आणि माजी नगरसेविका सुषमा निम्हण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला “सन्मान स्त्रीशक्तीचा… खेळ खेळू पैठणीचा अर्थात होम मिनिस्टर” हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग घेतला. आनंद, मनोरंजन आणि धमाल यांचा मनमुराद आनंद घेत सहभागी महिलांनी विविध आकर्षक बक्षिसे जिंकली.
या कार्यक्रमास भोर–राजगड–मुळशी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. शंकरभाऊ मांडेकर यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनी उपस्थित माता-भगिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी सात गावांच्या लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान दोन विजेत्यांना ऍक्टिवा दुचाकीचे वितरण करण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
कार्यक्रमाला मिळालेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “या कार्यक्रमाला मिळालेलं प्रेम, प्रतिसाद आणि गर्दी पाहून मी अक्षरशः भारावून गेलो आहे. बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्व माता-भगिनींचे मनःपूर्वक आभार. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या माझ्या संपूर्ण टीमचेही मनापासून आभार. आपलं प्रेम, पाठिंबा आणि विश्वास अशीच प्रेरणा देत राहो, हीच अपेक्षा.”
यावेळी बोलताना आमदार शंकर मांडेकर यांनी सांगितले की, “विकासात्मक दृष्टिकोन ठेवून नागरिकांच्या सेवेत प्रमोद निम्हण आणि सुषमा निम्हण यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली असून, येणाऱ्या काळात त्यांना साथ देत विकासाची गती कायम ठेवणे आवश्यक आहे.”
यावेळी हभप शांताराम महाराज निम्हण, सारिका मांडेकर, सरला बाबुराव चांदेरे, ज्योती राहुल बालवडकर, पुनम विशाल विधाते, राहुल बालवडकर, बालम तात्या सुतार, विशाल विधाते, राजेश विधाते, यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाने स्त्रीशक्तीचा सन्मान करत सामाजिक एकतेचा आणि आनंदाचा संदेश दिला.








More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!