बोपोडी :
युवा पिढी सामाजिक व इतर क्षेत्रात सक्रिय नाही, असे चित्र अनेकदा मांडले जाते. मात्र बोपोडी येथील सामाजिक क्षेत्रात सातत्याने आणि भरीव कार्य करणारे विजय ढोणे हे त्याला ठाम अपवाद असल्याचे मत लक्ष्मीदीदी यांनी व्यक्त केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कार्य करणारे कार्यकर्ते पुढे येणे आजच्या काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जगभरात पर्यावरणासंदर्भात विविध धोरणे ठरविली जात असताना, पुणे शहरात वनवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने गेली पाच वर्षे सातत्याने पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात आहेत. या सामाजिक कार्याचा सविस्तर अहवाल सर्वधर्मीय गुरूंच्या हस्ते बोपोडी येथील सभागृहात प्रकाशित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय ढोणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मीदीदी, डॉ. अमृता पाटील, भन्ते हर्षवर्धन, भन्ते सासन सुरीत, फादर वर्गीस, ह.भ.प. आंग्रे महाराज, ज्येष्ठ विचारवंत वसंत साळवे उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सौ. अंकिता ढोणे, कार्यक्षम नगरसेवक प्रकाश ढोरे, नगरसेविका शैलेजाताई खेडेकर, माजी नगरसेवक आनंद छाजेड, ॲड. रमेश पवळे, कैलासदादा गायकवाड, महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक राहुलजी शिंदे, भगत सर, धनंजय दरे, योगेश मोरे, राजेंद्र भुतडा, विनोद रणपिसे, विकास चव्हाण, कांताताई ढोणे, स्वाती जाधव, रेखा आगरवाल आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल ओव्हाळ, संतोष खरात, गणेश लांडे, शिवाजी आंग्रे, आकाश ढोणे, सागर साळुंके व अजित थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!