पिरंगुट :
पिरंगुट येथील पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूलची माजी विद्यार्थिनी कु. आरती दहिभाते हिने भारतीय हवाई दलात (Indian Air Force) अग्निवीर योजनेअंतर्गत निवड होऊन शाळेचा, कुटुंबाचा आणि परिसराचा नावलौकिक वाढवला आहे. आरती हिने सन 2020–21 मध्ये दहावी उत्तीर्ण केली होती.
अत्यंत कष्ट, शिस्त, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर आरतीने हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल, पिरंगुट येथे तिचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. आरतीच्या या यशामुळे शाळेतील तसेच परिसरातील अनेक विद्यार्थिनींसाठी ती प्रेरणादायी आदर्श ठरली आहे.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “मुलींनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून मेहनत आणि जिद्दीने वाटचाल केली तर कोणतेही ध्येय अशक्य नाही.”
या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे, माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार आणि पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कु. आरती दहिभातेचे मनःपूर्वक अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल आणि यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!