बालेवाडी :
प्रभागातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणींवर त्वरित उपाययोजना करणे हे अमोल बालवडकर QRT टीमचे प्रमुख वैशिष्ट्य ठरत आहे. “शब्द नाही, काम बोलतं” या तत्त्वावर कार्यरत असलेली ही टीम नागरिकांच्या समस्या समोर येताच क्षणाचाही विलंब न करता मैदानात उतरते.
रस्त्यावरील अडथळे, पाणीपुरवठा व विजेच्या तातडीच्या समस्या, चेंबर साफसफाई व बदल, आवश्यक ठिकाणी जेसीबी यंत्रणा उपलब्ध करून देणे, रस्त्यालगत वाढलेल्या झाडांच्या फांद्या कापणे, बंद पडलेले पथदिवे सुरू करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे व रस्ता दुरुस्ती, अशा अनेक कामांमध्ये QRT टीमने आजपर्यंत प्रभावी कामगिरी बजावली आहे.
याशिवाय प्रशासकीय कामांमध्ये अडथळे येत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष पाठपुरावा करून नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यातही QRT टीम पुढाकार घेत आहे. मुळा नदी व राम नदीला पूर आल्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत तसेच अतीवृष्टीमुळे पुणे शहरात उद्भवलेल्या संकटाच्या वेळीही अमोल बालवडकर QRT टीम नागरिकांच्या मदतीसाठी तत्परपणे उभी राहिली.
ग्राउंड लेव्हलवर जाऊन प्रत्यक्ष नागरिकांना मदत पोहोचवणे, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्वरित उपाययोजना करणे आणि परिसरातील नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळवून देणे हेच QRT टीमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
अमोल बालवडकर QRT टीमची ही सातत्यपूर्ण तत्परता आणि कार्यक्षमतेमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून, “शब्दांपेक्षा काम महत्वाचं” असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.


More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले