सुतारवाडी :
प्रभाग क्रमांक ९ मधील सुतारवाडी गावात भाजप उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर यांनी गाव भेट दौरा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक कुटुंबप्रमुख, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिलावर्ग तसेच ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि परिसराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक गरजा जाणून घेतल्या.
गावकऱ्यांनी व्यक्त केलेला विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकी ही पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी प्रेरणादायी असल्याचे लहू बालवडकर यांनी यावेळी सांगितले. दौऱ्यात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पायाभूत सुविधा, रोजगाराच्या संधी तसेच तरुणांच्या कौशल्य विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी मांडलेल्या सूचनांमुळे आगामी विकासकामांची दिशा अधिक स्पष्ट झाल्याचे त्यांनी नमूद केले.
या गाव भेट दौऱ्यात कुटुंबप्रमुख, सहकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याबद्दल आणि मिळालेल्या प्रेमाबद्दल लहू बालवडकर यांनी आभार व्यक्त केले.
सुस गावातील दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या नंतर सुतारवाडीतील हा दौरा उत्साहात पार पडला. नागरिकांच्या विश्वासाच्या बळावर हा जनसंवाद आणि विकासाचा प्रवास पुढेही अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!