आंबेडकर नगर, बाणेर :
बाणेर परिसरातील आंबेडकर नगर येथील नागरिकांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. अजालिया सोसायटी ते रेणु इलेक्ट्रॉनिक कंपनी, रणवरे निवास ते बाणेर दूरध्वनी केंद्र तसेच पेनिनसुला सोसायटी ते बाटा शोरूम या अत्यंत महत्त्वाच्या व वर्दळीच्या मार्गांचे डांबरीकरण माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांच्या माध्यमातून पूर्ण झाले आहे.
या रस्त्यांची अवस्था यापूर्वी अत्यंत दयनीय झाल्याने परिसरातील नागरिक, वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता डांबरीकरण पूर्ण झाल्याने नागरिकांचा प्रवास सुकर, सुरक्षित व विनाअडथळा होणार असून अनेक सोसायट्यांमधील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवीन डांबरीकरणामुळे परिसरातील रस्त्यांना नवसंजीवनी मिळाली असून विकासकामांना अधिक गती मिळाली आहे. हा विकास केवळ रस्त्यांपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या महत्त्वाच्या नागरी पायाभूत सुविधांचा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना युवक अध्यक्ष समीर चांदेरे म्हणाले की, “नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत अशाच विकासकामांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, होतो आणि राहू.”
या कामाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत संबंधित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.



More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!