पाषाण :
पाषाण – सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस, म्हाळुंगे, बाणेर आणि बालेवाडी परिसरातील महिला भगिनींसाठी नगरसेवक मा. प्रमोद नामदेवदादा निम्हण यांच्या पुढाकाराने भव्य व आकर्षक ‘होम मिनिस्टर – सन्मान स्त्री शक्तीचा, खेळ खेळू पैठणीचा!’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महिलांच्या सन्मानासाठी आणि उत्साहवर्धनासाठी होणाऱ्या या कार्यक्रमात यंदा लकी ड्रॉद्वारे तब्बल १४ टू-व्हीलर जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. याशिवाय फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, किचन सेट यांसारखी अनेक उपयुक्त व आकर्षक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. परिसरातील प्रत्येक उपस्थित महिलेस विशेष साडी आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
📅 कार्यक्रमाची माहिती
• रविवार, १४ डिसेंबर २०२५
• सायंकाळी ५.०० वा.
• स्थळ : आय. टी. आय. ग्राऊंड, सुतारवाडी रोड, पाषाण, पुणे
महिलांच्या सर्वांगीण सन्मानासाठी, त्यांच्या योगदानाची कदर करण्यासाठी आणि उत्साह वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
आयोजक
• श्री. प्रमोद(अण्णा) नामदेवदादा निम्हण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश प्रतिनिधी, माजी नगरसेवक, पुणे मनपा
• सौ. सुषमा प्रमोद (आण्णा) निम्हण, नगरसेविका, पुणे मनपा
📞 अधिक माहितीसाठी: 9107080909 / 8657414141




























More Stories
कोथरूड विधानसभा मधील पाषाण-सुतारवाडी लिंक रोड वरील कचऱ्यावरून राजकारण पेटले! अमोल बालवडकरांच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; पण तत्परता फक्त ‘खास’ भागापुरतीच का?
सुस परिसर वाहतूक कोंडीबाबत अनिकेत चांदेरे यांच्याकडून वाहतूक पोलिसांना निवेदन
मैत्रीचा धागा, विश्वासाचे नाते! युवा स्पंदनतर्फे चतुःश्रुंगी व कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फ्रेंडशिप डे उपक्रम