बाणेर :
बाणेर परिसरात २४ वर्षीय तरुण नेता जयेश संजय मुरकुटे (कार्याध्यक्ष – कोथरूड विधानसभा, NCP – शरदचंद्र पवार गट) यांना धमक्या देऊन धक्काबुक्की केल्याचा आरोप शनिवारी समोर आला आला आहे.
मुरकुटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, माजी स्थायी समिती अध्यक्ष व माजी नगरसेवक बाबुराव चांदेरे आणि त्यांचे पुत्र समीर चांदेरे यांनी बाणेर येथे झालेल्या वादाच्या प्रसंगी—
अवमानकारक व गलिच्छ भाषा वापरली,
थेट जीवाला धोका देण्यासारख्या धमक्या दिल्या,
धक्का-बुक्की करण्याचा प्रयत्न केला,
तसेच PMC अधिकाऱ्यांवर दबाव टाकून खाजगी मालमत्तेत घुसखोरी करविल्याचा आरोप केला आहे.
PMC कडून बेकायदेशीर घुसखोरीचा आरोप
मुरकुटे यांच्या म्हणण्यानुसार, सर्व्हे नं. 13/3 मधील खाजगी मालमत्तेत पुणे महानगरपालिकेच्या पथकाने—
कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता,
कायदेशीर प्रक्रिया न पाळता,
तिसरी पाईपलाइन टाकण्याचा प्रयत्न केला,
आणि हा कारभार चांदेरे पितापुत्रांच्या दबावाखाली केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुरकुटे यांची प्रतिक्रिया
यासंदर्भात जयेश मुरकुटे म्हणाले “धक्का-बुक्की, धमक्या आणि गुंडशाही—मी अजिबात सहन करणार नाही. तरुण आहे म्हणून कोणीही मला दडपशाहीखाली आणू शकत नाही. संपूर्ण प्रकरण कायदेशीर मार्गाने शेवटपर्यंत नेणार आहे.”


More Stories
*औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन, नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचे नागरिकांना कुटुंबासह सहभागी होण्याचे आवाहन*
बाणेरच्या ‘रेजेन्सी अस्ट्रा’ प्रकल्पाला स्टॉपवर्क! सर्व्हे नं. ५४ मधील रोहन लेहेर लेआउटच्या अॅमेनिटी स्पेस गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेची कारवाई*
*प्रसिद्ध डायरेक्ट सेलिंग कंपनी ‘प्रोव्हेदा इंडिया’चा ७ वा वर्धापन दिन पुण्यात दणक्यात संपन्न!*