February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

मुळशी केसरी स्पर्धा 2025 – मुळशीच्या आखाड्यातील भव्य जल्लोष! १८ व्या वर्षी ऐतिहासिक आणि विक्रमी स्पर्धेचे आयोजन..

मुळशी :

मुळशी केसरी प्रतिष्ठान च्या वतीने भव्य मुळशी केसरी स्पर्धा 2025 चे सलग १८व्या वर्षी ऐतिहासिक आणि विक्रमी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
मुळशी तालुक्यातील कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी मानली जाणारी मुळशी केसरी कुस्ती स्पर्धा 2025 यंदा सलग १८व्या वर्षी अधिक भव्य स्वरूपात पार पडणार आहे. मुळशी केसरी प्रतिष्ठान तर्फे ही गौरवशाली परंपरा कायम ठेवत या वर्षीही स्पर्धेचे आकर्षक आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी खास पत्रकार परिषदेचे आयोजन करून
या स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेस पत्रकार बांधवांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
येत्या रविवारी म्हणजेच १४ डिसेंबरला घोटवडे फाटा येथे कुस्तीचा महासंग्राम होणार, ही भव्य स्पर्धा रविवार, दि. १४ डिसेंबर 2025 रोजी घोटवडे फाटा सुंदरबन लॉन्स, शेजारी, ता. मुळशी, जि. पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत वजन करणे होईल. या स्पर्धेसाठी मुळशी केसरी प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्षांचे मार्गदर्शन लाभले असून जय्यत तयारी सुरू केली आहे.

या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन हे संस्थापक, श्री. भास्कर मोहोळ व अध्यक्ष, श्री. राजेंद्रभाऊ बांदल यांच्या पुढाकारातून करण्यात आले असून, मुळशीतील कुस्ती परंपरेला नवसंजीवनी देण्याचे काम प्रतिष्ठान सातत्याने करत आहे.

महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरीनंतर सलग सर्वाधिक वर्षे अखंड सुरू असलेली ही एकमेव कुस्ती स्पर्धा आहे. त्यामुळे मुळशी केसरी स्पर्धेचे महत्त्व आणि गौरव राज्यभरातील सराव्यांमध्ये विशेष प्रतिष्ठित आहे.

🏆 स्पर्धेतील वजन गट व पारितोषिकांची आकर्षक खैरात आहे.
५७ किलो गट – प्रथम क्रमांक: ₹१५,००० व चषक, द्वितीय: ₹१०,००० व चषक, तृतीय: ₹५,००० व चषक,
चतुर्थ: ₹३,००० व चषक.
६१ किलो गट – प्रथम ₹१५,००० व चषक, द्वितीय: ₹१०,००० व चषक, तृतीय: ₹५,००० व चषक,चतुर्थ: ₹३,००० व चषक. ६५ किलो गट –
प्रथम: ₹२१,००० व चषक, द्वितीय: ₹११,००० व चषक, तृतीय: ₹७,००० व चषक,
चतुर्थ: ₹५,००० व चषक.
७० किलो गट – प्रथम: ₹२१,००० व चषक, द्वितीय: ₹११,००० व चषक,तृतीय: ₹७,००० व चषक, चतुर्थ: ₹५,००० व चषक,
७४ किलो गट – प्रथम: ₹२५,००० व चषक,
द्वितीय: ₹१५,००० व चषक,तृतीय: ₹१०,००० व चषक, चतुर्थ: ₹७,००० व चषक.

*🥇 मुळशी केसरी विजेता – ग्रँड प्राईज*
प्रथम: ₹३१,००० व खरी चांदीची गदा, उपविजेता ₹२१,००० व चषक, तृतीय: ₹१५,००० व चषक, चतुर्थ: ₹११,००० व चषक.
सर्व गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ विजेत्यास चषक व रोख रक्कम तसेच सर्व गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ विजेत्यास चांदीची नोट आणि सर्व गटातील विजेत्यास ट्रॅकसूट व उपविजेत्यास अप्पर बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

या स्पर्धेस राज्यातील कुस्ती जगतातील नामांकित पहलवान, प्रशिक्षक, पंच आणि दिग्गज मान्यवर आवर्जून भेट देऊन जास्तीत जास्त मूळशीकरांची उपस्थिती अपेक्षित असून मैदानावर दणक्यात, सणासुदीच्या वातावरणात हा खरा कुस्ती मेळा पार पडणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी सांगितले.
कुस्ती चाहत्यांसाठी हा एक अविस्मरणीय सोहळा ठरणार आहे.

मुळशीच्या मातीतील परंपरा, लढाऊ वृत्ती, दमदार खेळ आणि उत्सवमय वातावरण यांचा संगम असलेली ही स्पर्धा यंदाही प्रेक्षकांसाठी एक आगळा-वेगळा अनुभव देणार आहे.