बाणेर :
बाणेर येथील श्रद्धास्थान असलेल्या तुकाई माता मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. अनेक वर्षांपासून पायऱ्यांची व रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर सुशोभीकरणाचे काम हाती घेऊन मंदिरापर्यंतची वाट अधिक सुलभ, सुरक्षित आणि आकर्षक करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
स्थानिक विकासकामांना चालना देणे आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी या कामाचे उद्घाटन केले. “ग्रामस्थांच्या सोयीसाठी आणि श्रद्धास्थानाच्या जतनासाठी ही कामे करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
उद्घाटनप्रसंगी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री राहुल बालवडकर, श्री पांडुरंग कळमकर, श्री दत्तात्रय कळमकर, श्री सत्यवान कळमकर, श्री संतोष कळमकर, श्री अभिजीत कळमकर, श्री सुमित कळमकर, श्री राजेंद्र अर्जुन कळमकर तसेच कळमकर परिवारातील अनेक सदस्य उपस्थित होते.
या सुशोभीकरणाच्या कामामुळे तुकाई मातेच्या दर्शनाची वाट अधिक सोयीस्कर होणार असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.




More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!