बालेवाडी :
राहुल दादा बालवडकर जनसंपर्क कार्यालय, दसरा चौक, बालेवाडी येथे चैतन्य गायक कट्टा, ज्येष्ठ नागरिक बालेवाडी यांचा दुसरा वर्धापन दिन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. सोहळ्यात डॉ. संजय कळमकर सरांचे प्रेरणादायी व मार्गदर्शनात्मक व्याख्यान घेण्यात आले, ज्याचा लाभ उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मिळाला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभाग क्रमांक ९ मध्ये मोफत अँब्युलन्स सेवेचा शुभारंभ आणि अँब्युलन्सचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमासाठी डॉ. रमनप्रीत जी (संस्थापक व अध्यक्ष, PIBM Group) यांचा विशेष सहकार्य लाभला असून, समाजासाठी हा मोठा योगदान ठरला आहे. हा उपक्रम विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आला आहे.
उद्घाटन प्रसंगी मा. बाबुराव आप्पा चांदेरे, प्रमोदअण्णा निम्हण, रोहिणीताई चिमटे, समीरभाऊ चांदेरे, ज्योतीताई बालवडकर, सरलाअक्का चांदेरे, मनोज बालवडकर पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व मान्यवर. त्यासोबतच संजयबाप्पु बालवडकर, प्रकाश तात्या बालवडकर, विलास तात्या बालवडकर, अंकुशतात्या बालवडकर , अनिल तात्या बालवडकर, आनंदा कांबळे (पोलीस पाटील), संदीप बालवडकर, चेतन बालवडकर, शशी बालवडकर, मोहन वर्दे सर, सैनी सर, अजय कदम साहेब, नितीनसर कळमकर, विद्याधर तात्या गांधिले, अर्जुन शिंदे, अर्जुन ननावरे, महादेव चाकणकर, अमेय जगताप, नरेंद्र बालवडकर उपस्थित होते.
🌟 ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी व सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या डॉ. प्रदीपजी देशपांडे (PD दादा) यांचे मनःपूर्वक अभिनंदन.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी