पिरंगुट :
चॅम्पियन्स कराटे क्लब, डोंबिवली येथे आयोजित स्पर्धेमध्ये
पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल, पिरंगुट येथील विद्यार्थी कृष्णा भारती याने अप्रतिम कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
👉 कराटे फाईट – वरीष्ठ गट (Above 40): सुवर्णपदक
👉 कराटे काटा– वरीष्ठ गट (Above 40): कांस्यपदक
त्याच्या या दुहेरी यशामुळे शाळेची आणि परिसराची मान उंचावली आहे. दृढ निश्चय, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या जोरावर कृष्णाने सिद्ध केले की—“जिद्द असेल तर विजय दूर नसतो!”
या यशामागे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल, कु. शिवानी बांदल तसेच प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे, माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार आणि पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मोलाची ठरली.
शाळेच्या वतीने कृष्णा भारतीचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून आगामी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.


More Stories
रणवीर हनुमान तरुण मंडळ वरची तालीम औंध मंडळ वतीने १११ वर्ष निमित्ताने आयोजित बाल चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
*मुळशी तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पेरिविंकलच्या खेळाडूंची दमदार कामगिरी!!*
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!