वारजे :
वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलात डेली सकाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 14 ते 16 वयोगटातील मुलींच्या कुस्ती स्पर्धेत पिरंगुट येथील पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट कामगिरी सादर करत शाळेचा गौरव वाढवला.
या स्पर्धेत—
🥇 53 किलो वजन गटात वेदिका कालेकर हिने दमदार खेळी सादर करत 1st रँक पटकावली.
🥈 65 किलो वजन गटात अंतरा कंधारे हिने जिद्दीच्या बळावर 2nd रँक मिळवून आपली छाप पाडली.
कुस्तीच्या मैदानावर दाखवलेले कौशल्य, ताकद आणि चिकाटी यामुळे पेरिविंकलच्या या वीरांगनांनी सर्वांचे कौतुक मिळवले.
या यशामागे शाळेच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र बांदल, संचालिका सौ. रेखा बांदल,कु. शिवानी बांदल, शाळेच्या प्राचार्या सौ. आसावरी हंचाटे, माध्यमिक विभागप्रमुख सौ. पूनम पांढरे, प्राथमिक विभागप्रमुख सौ. सना इनामदार, पूर्व-प्राथमिक विभागप्रमुख सौ. पल्लवी नारखेडे यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच श्री. हनुमंत मनेरे सर यांच्या प्रोत्साहनाने आणि शाळेच्या क्रीडा विभागाच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींनी कुस्तीमध्ये हा उल्लेखनीय पराक्रम साध्य केला.


More Stories
*प्रसिद्ध डायरेक्ट सेलिंग कंपनी ‘प्रोव्हेदा इंडिया’चा ७ वा वर्धापन दिन पुण्यात दणक्यात संपन्न!*
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात, कर्मचाऱ्यांच्या दिवाळीत आनंदाची भर; बाणेर नागरी पतसंस्थेचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श
ट्रॅकवर खिळे, मैदानात दारूच्या बाटल्या म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियम मधे खेळाडूंच्या स्वप्नांचा चुराडा, सराव सोडून मैदान खासगी इव्हेंट साठी उपलब्ध..