सूस :
महिलांसाठी विशेष तयार करण्यात आलेला आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेला चांडाळ चौकडी फेम ‘खेळ पैठणी’ हा भव्य उपक्रम सुस येथील आयरीस लॉन्स येथे उत्साहात व दिमाखात पार पडला. परिसरातील शेकडो महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे अनेक परप्रांतीय महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमात महिलांसाठी विनोदी संवाद, मजेशीर खेळ, नृत्य, गाणे यांची मनसोक्त मेजवानी देण्यात आली. महिलांनी मुक्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाचे सादरीकरण रामभाऊ जगताप (चांडाळ चौकडी फेम) यांनी विनोदी शैलीत करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
कार्यक्रमात आकर्षक बक्षिसांचे विशेष आकर्षण होते. भाग्यवान विजेत्यांना इलेक्ट्रिक स्कूटर, टीव्ही, फ्रिज, कुलर, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, मिक्सर अशी अनेक मौल्यवान बक्षिसे देण्यात आली, यामुळे कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित झाला.
या उपक्रमाचे आयोजन सौ. प्रियांका विनायक चिव्हे (सदस्या, भाजपा) यांनी केले. महिलांसाठी आनंदाचे, सहभागाचे आणि व्यक्त होण्याचे व्यासपीठ मिळत असल्याने अनेक महिलांनी भावनिक शब्दांत आयोजकांचे आभार मानले.
प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये —
महिला मोर्चा अध्यक्षा वैदही बापट, माजी नगरसेविका स्वप्नालीताई सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, मयुरी कोकाटे, धनश्री भोते, तसेच महिला मोर्चातील सर्व पदाधिकारी यांचा समावेश होता.
याशिवाय सरचिटणीस पुनीत जोशी, मंडलाध्यक्ष लहू आण्णा बालवडकर,शिवम बालवडकर, सचिन दळवी, रोहन कोकाटे, अनिकेत चांदरे, शरद तात्या भोते, चंद्रकांत जाधव, काळुराम गायकवाड, सुहास भोते, राजेंद्र पाडाळे, राकेश पाडाळे, प्रकाश तापकीर, शिवाजी चिव्हे, राहुल कोकाटे, सचिन पाषाणकर, खंडू खैरे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी महिलांनी अशा उपक्रमांमुळे समाजातील एकोपा बळकट होत असून आनंद व संवाद वाढीस लागतो, अशी भावना व्यक्त केली.



More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले