पाषाण :
पाषाण परिसरात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या “Folk” या मराठी लोककलेच्या रंगतदार उत्सवाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम अविस्मरणीय बनवला. लक्ष्मी सचिन दळवी यांच्या पुढाकाराने आणि सचिन दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत देखण्या वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात समाजभूषण शांताराम आण्णा निम्हण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मराठी संस्कृतीच्या परंपरेनुसार कोथरूड उत्तर मंडल अध्यक्ष लहू अण्णा बालवडकर यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले.
यानंतर लोककलेचे विविध मनमोहक सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकारांचा सत्कार भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी भाजपचे परिसरातील माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहून कार्यक्रमाला भक्कम पाठिंबा दिला. पाषाणने अनुभवलेला हा लोककलेचा जल्लोष नागरिकांच्या मनावर कायमची छाप सोडून गेला!



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी