बावधन :
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान आणि सुजाता महिला मंडळ बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ नगर, बावधन बुद्रुक येथे महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामुदायिक बुद्ध वंदना सादर केली.
या प्रसंगी बावधन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते, पेरीविंकल ग्रुप ऑफ स्कूल्सचे चेअरमन राजेंद्र बांदल,
माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, युवा नेते सूर्यकांत भुंडे,माजी सरपंच वैशाली कांबळे, रिपाइं (आठवले) महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडीचे संघटक उमेश कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा, सामाजिक क्रांतीतील योगदानाचा आणि बौद्ध मूल्यांच्या प्रसारातील भूमिकेचा उल्लेख करत आपले मनोगत व्यक्त केले. सभेत सिद्धार्थ नगरमधील उपासक–उपासिका, स्थानिक नागरिक आणि बावधन परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. अभिवादन कार्यक्रमानंतर बावधनमधून शेकडो भीमसैनिक चैत्यभूमी, दादर (मुंबई) येथे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रवाना झाले.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी