बाणेर :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभाग क्र. ९ भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा. विशाल गांधिले यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. सामाजिक न्याय, समानता व संविधान मूल्यांच्या जपणुकीचा संकल्प उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाला मा. विशाल गांधिले, बाळासाहेब देशमुख, शैलेंद्र कदम, चैतन्य बनकर, निसर्ग गांधिले, पंकज जमदाडे, अशुतोष भुजबळ, ओंकार भोसले, ह्रिषीकेश गांगुर्डे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा व विचारांचा आदर्श ठेवत समाजहिताची कार्ये अधिक जोमाने राबवण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी