सुसगाव :
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या “मिशन निर्मल” स्वच्छता अभियानाला सुस परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ७० दिवसांत तब्बल ७० किलोमीटर परिसराची स्वच्छता करून हा उपक्रम एक अद्भुत ठेवा ठरत आहे.
यावेळी सुस गाव तसेच सुस मेन रोड परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता उपक्रम पार पडला. HP पेट्रोल पंप परिसरापासून ते आतील रस्त्यांपर्यंत विविध सोसायट्या, कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल्स, व्यावसायिक इमारती आणि वसाहतींमध्ये व्यापक साफसफाई करण्यात आली.
या मोहिमेत साई कृपा, साई कॉम्प्लेक्स, बिकानेर मिठाईवाले, अॅपल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, विंडोज हौसिंग सोसायटी, पार्थ जैनम, साईश्री, ऑरेंज ट्री, ग्रीन कॅसल, कॅसल रॉक, सुटॉम कॉम्प्लेक्स, जीवन हॉस्पिटल, शाकुंतल कॉम्प्लेक्स, आयुष्यमान आरोग्य मंदिर, S3 प्राईम, सीझन्स इन, श्री समर्थ कृपा सभागृह, आयरिस लॉन्स, सुस आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक, ओनेला नेस्ट–II, अकीला होम्स, समर्पण अपार्टमेंट्स आदी ठिकाणी स्वच्छता उपक्रम पार पडले.
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबतच परिसरातील अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभाग नोंदवला आणि ‘‘स्वच्छ सुस, सुंदर सुस’’ हा संदेश दिला.
अमोल बालवडकर यांनी चालविलेल्या मिशन निर्मल अभियानाने आतापर्यंत ७० दिवसांत ७० किलोमीटर स्वच्छता करून एक आदर्श उपक्रम उभा केला आहे. गाव, रस्ते, सोसायट्या, सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्यासाठी हा उपक्रम पुढेही असेच निरंतरपणे सुरू ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
स्वच्छतेचा हा संकल्प, सामूहिक सहभागातून अधिक बळकट झाला असून सुस परिसर ‘मिशन निर्मल’च्या माध्यमातून स्वच्छतेकडे वाटचाल करत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी