बाणेर :
बाणेर येथील प्रथमेश पार्क सोसायटी परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या अत्यावश्यक कामाला पुणे महानगरपालिकेचे मा. स्थायी समिती अध्यक्ष मा. बाबुरावजी चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल दादा बालवडकर आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष समीर चांदेरे यांनी आज या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या कामाचे स्वागत केले असून, त्यांच्या मागणीनुसार रस्त्यांना नव्याने झळाळी देण्याचे काम सुरू झाले आहे. परिसरात अधिक सुसज्ज, सुरक्षित आणि सोयीस्कर दळणवळण सुविधा निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करत, “नागरिकांच्या प्रत्येक मागणीला प्राधान्य देत त्यावर तातडीने अंमलबजावणी करणं हेच आमचं ध्येय आहे,” असे समीर चांदेरे, युवक अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे शहर यांनी सांगितले.
रस्ता काम सुरू करण्यापूर्वी झालेल्या नागरिक बैठकीतही एक महत्त्वाची भावना व्यक्त करण्यात आली. नागरिकांनी विशेष नमूद केले की, २०१२-१३ मध्ये या परिसरातील लाइट, ड्रेनेज आणि रस्त्यांची महत्त्वाची कामे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनीच केली होती. “आज पुन्हा आपल्या मार्गदर्शनाखाली आमच्या रस्त्याचे डांबरीकरण होत आहे. आपण नेहमीच आमच्या भागातील कामे मार्गी लावता; त्यामुळे प्रथमेश पार्कचे नागरिक आपल्या पाठीशी सदैव उभे राहतील,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
स्थानिकांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या तत्परतेने हा विकासाचा उपक्रम पुढील काही दिवसांत पूर्ण होणार आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी