February 4, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पाषाणमध्ये ‘Folkलोक’ दुर्मिळ लोकसंगीताचा अद्वितीय जागर! सचिन दळवी सोशल फाऊंडेशनतर्फे भव्य कार्यक्रमाचे आयोजन..

पाषाण :

पाषाण परिसरातील सांस्कृतिक परंपरेला नवी चालना देत सचिन दळवी सोशल फाऊंडेशनतर्फे प्रथमच ‘Folkलोक’ या दुर्मिळ लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्मीळ होत चाललेल्या लोककला, पारंपरिक सुरावट आणि ग्रामीण संस्कृतीचा अस्सल वारसा शहरवासीयांसमोर आणण्याचा हा उपक्रम विशेष ठरणार आहे.

हा खास सांस्कृतिक सोहळा
📅 शनिवार, दिनांक ६ डिसेंबर २०२५
⏰ सायंकाळी ६.०० वाजता
📍 ज्ञानदीप मंगल कार्यालय, सुस रोड, पुणे
येथे आयोजित करण्यात आला असून, प्रवेश मोफत आहे.

कार्यक्रमात पारंपरिक लोकगीतं, ढोल-ताशांचा ताल, भारुड, गोंधळ, कोळीगीतं तसेच अनेक दुर्मीळ लोकसंगीत प्रकारांची थरारक सादरीकरणे प्रेक्षकांसाठी सज्ज असतील. स्थानिक तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच लोककलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.

मोफत प्रवेशिकांसाठी संपर्क केंद्रे :

1️⃣ सचिन दळवी जनसंपर्क कार्यालय
श्री. सोमेश्वर मंदिरासमोर, सोमेश्वरवाडी, पाषाण, पुणे
☎️ 78283 81352

2️⃣ सचिन दळवी जनसंपर्क कार्यालय
मोरया रेसिडेन्सी, सुस रोड, पाषाण, पुणे
☎️ 97676 76301

3️⃣ लहू बालवाडकर जनसंपर्क कार्यालय
सर्वे नं. १६, बालेवाडी–बाणेर मेन रोड, ब्राव्हेरिया सोसायटी समोर, बालेवाडी, पुणे
☎️ 93719 90077 / 83809 90077

पाषाण आणि परिसरातील नागरिकांसाठी लोकसंगीताचा अद्वितीय आनंद घेण्याची ही एक अप्रतिम संधी आहे. कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.