सुसगाव :
न्यू इंग्लिश स्कूल सुसगाव येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. माजी नगरसेवक पुणे मनपा मा. प्रमोद आण्णा निम्हण यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या सीसीटीव्ही प्रणालीच्या लोकार्पणाचा सोहळा आमदार शंकर भाऊ मांडेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या प्रसंगी आमदार शंकर भाऊ यांनी शाळेची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा, उपलब्ध सुविधा आणि स्थानिक समस्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक प्रगती हेच आपले सर्वोच्च ध्येय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
“सुसगावातील शैक्षणिक वातावरण अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. समाजहितासाठी असे उपयुक्त उपक्रम यापुढेही राबविले जातील,” असे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांनी नमूद केले.
स्थानिक पातळीवरील या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत मोठी भर पडणार आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी