मुलांना सर्व काही मागितल्या मागितल्या देण्यापेक्षा त्यांच्या प्रत्येक गोष्टी मनापासून ऐकणे महत्वाचे!!! – आयुक्त पौर्णिमा बांदल यांचे मनोगत..
कोथरूड :
चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लीश मिडीयम स्कूल च्या पिरंगुट, पौड , कोळवण आणि माले या सर्व शाखांचे यांचे वार्षिक स्नेहसंमेलन “सेतू – Local to Global ” मोठ्या उत्साहात बुधवार दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे संपन्न झाले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा होता. या स्नेह संमेलनात पिरंगुट,पौड, माले, कोळवण येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्यविष्कारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने , दीपप्रज्वलन व रंगमंच पूजन करून करण्यात आला . यावेळी सन्माननीय अतिथी माननीय डॉ चेतनानंद महाराज पुणेकर , सहाय्यक पोलिस आयुक्त सौ पौर्णिमा बांदल, माजी सभापती बाबासाहेब कंधारे , मुळशी तालुक्याचे शिवसेना अध्यक्ष सचिन खैरे, युवा सेना सचिव, महाराष्ट्र राज्य श्री आबासाहेब शेळके, गंगाराम मातेरे, विद्यार्थी सेना मुळशी तालुका रामभाऊ गायकवाड, राष्ट्रवादी युवा नेते मिलिंद वाळंज, माजी उपसभापती भानुदास पानसरे, रमेश पवळे माजी सरपंच पिरंगुट, तुषार पवळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, कैलास मारणे, पत्रकार अर्जुन पसाले, कृष्णा पानसरे, प्रीतीताई दगडे आयोजक भव्य किर्तन महोत्सव , मायाताई गावडे, मीनलताई भरते, अमित आखाडे तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, तरूण तडफदार डायरेक्टर शिवानी बांदल , यशराज बांदल व सौ. निर्मल पंडीत आदी मान्यवर उपस्थित होते.
पूर्वप्राथमिक ते ९वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अद्वितीय सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. गणेश वंदनेच्या माध्यमातून ९वीच्या विद्यार्थ्यांनी भक्तिरसाची अनुभूती दिली. तसेच, लोककला, परंपरा आधुनिकता व जागतिक संस्कृती यांनी सेतू या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या मूळ संकल्पनेला जिवंत ठेवले. विद्यार्थ्यांनी स्थानिकतेपासून जागतिकतेपर्यंतचा प्रवास नृत्य , नाट्य, वेशभूषा आणि कलात्मकतेतून अप्रतिमपणे साकारला आणि प्रेक्षकांची मने जिंकली.
विद्यार्थ्यांनी कोळी गीत, भांगडा, साल्सा, हिप हॉप, चक दे इंडिया, छत्रपती संभाजी महाराजांवर छावा गीत, पश्चिमी व पंजाबी गाणी, भयपट, महिला सशक्तीकरणावर विशेष सादरीकरण, दक्षिण भारतीय नृत्य, रेट्रो टू मेट्रो क्रीडाविश्व ,जय जवान जय किसान आणि मावळे व शिवछत्रपती या थीमवरील सादरीकरणांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्यांना, गाण्यांना टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद मिळाला.
सर्व मान्यवरांच्या हस्ते विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे बहाल करण्यात आली. त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ, नारळ,शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. “सेतू” च्या कडेवर स्वार होत हा कार्यक्रम एकजुटीचा, सृजनशीलतेचा आणि आनंदाचा उत्सव ठरला!
चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थापक श्री. राजेंद्र बांदल सर व संचालिका सौ.रेखा बांदल, शिवानी बांदल युवा संचालक श्री.यश बांदल सर व सर्व शाखा समन्वयक सौ निर्मल पंडित यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. आसावरी हंचाटे व सौ वीणा कदम यांनी प्रास्ताविकेतून व समारोपासून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका आसावरी हंचाटे व वीणा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक पूनम पांढरे , प्राथमिक विभागप्रमुख सना इनामदार, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख पल्लवी नारखेडे, पौड च्या पर्यवेक्षिका नेत्रा काकडे, , कोळवण येथील मयुरी दोशी व माले येथील रोहिणी शेंडे यांच्या सहकार्याने सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विदयार्थी यांच्या मदतीने अत्यंत शिसतबद्ध रीतीने संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा भोसले व विद्यार्थ्यांनी केले होते. वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




More Stories
योगीराज पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप….
पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, सूस येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा भावस्पर्शी निरोपसमारंभ सोहळा संपन्न.
“शिक्षणाबरोबरच मूल्यसंस्कार घडले तरच विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होते” – मा. आमदार शरद ढमाले