सूस :
बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस आणि महाळुंगे परिसरातील महिलांसाठी चांडाळ चौकडीच्या करामती फेम ‘खेळ पैठणीचा’ हा भव्य कार्यक्रम रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आर्यलिस लॉन, सुस येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन सौ. प्रियांका विनायक चिव्हे (सदस्या – भाजप, BE Civil) आणि श्री. विनायक शिवाजी चिव्हे (चिटणीस – भाजप, कोथरूड उत्तर मंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे सादरकर्ते श्री. रामभाऊ जगताप असून महिलांच्या सहभागासाठी आकर्षक बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमात प्रथम पारितोषिक म्हणून पैठणी + फ्रिज, द्वितीय पारितोषिक वॉशिंग मशीन, तृतीय पारितोषिक LED TV, चौथे पारितोषिक कूलर, तर पाचवे पारितोषिक मायक्रोवेव्ह ओव्हन अशी बक्षिसे जाहीर केली आहेत. तसेच कार्यक्रमातील महिलांसाठी इलेक्ट्रिक स्कूटीचा लकी ड्रॉ हा विशेष आकर्षणाचा भाग असेल.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि नारीशक्तीच्या गौरवासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी रोहित बालवडकर व प्रसाद पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कार्यक्रमास उपस्थित कुपन धारक महिलेस साडी भेट दिली जाणार असून लकी ड्रॉ मध्ये भाग्यवंत महिलेस इलेक्ट्रिक स्कुटी भेट देण्यात येणार आहे.
भारतीय जनता पार्टी कोथरूड विधानसभा उत्तर मंडळ नारीशक्तीच्या सन्मानार्थ भव्य उपक्रम राबविण्यात आला आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी