February 5, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल च्या विद्यार्थ्यांचे नाव सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून पेरीविंकल चे विद्यार्थी म्हणजे शिक्षण,संस्कृती आणि कलाकृतीचा अनोखा मिलाप: श्री नारायणजी चांडक यांचे पेरीविंकल च्या स्नेहसंमेलना प्रसंगी उदगार!!!

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज च्या सूस शाखेचे स्नेहसम्मेलन …. “*अवतार*- अंत: अस्ति प्रारंभ:!!! उत्साहात संपन्न

चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज च्या सूस शाखेचे स्नेहसम्मेलन आज मंगळवार दि. २ डिसेंबर रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे अत्यंत उत्साहात व जल्लोशात संपन्न झाले.
“अवतार” अंत: अस्ति प्रारंभ: ! या थीम वर आधारित शाळेच्या मुख्याध्यापिका सौं निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

अवतार म्हणजेच प्रत्येक वाईट असूर शक्तींचा नाश करण्यासाठी देव देवतांनी अवतार घेऊन राक्षसांचा संहार केला. आत्तापर्यंत होऊन गेलेले अवतार आजच्या या पिढीला माहिती हवे यासाठी गणपती मुशकराज, वामन अवतार आणि बळी राजा, राम आणि रावण अवतार, कोरोना वॉरियर्स, तारकेय आणि तारकासुर, लक्ष्मण आणि इंद्रजीत, कृष्ण आणि कंस, नरसिंह आणि हिरण्यकश्यपू , कालीमाता आणि रक्तबीज, वराह अवतार, शिव आणि अंधकासुर असे एक से बढकर एक अवतार त्या ऍक्ट व डान्स परफॉर्मन्स मधून सूस शाखेच्या चिमुकल्यानी दाखवून दिले. आग अग्नी, आयी गिरी नंदिनी, नरसिंह आला आदी एक से बढ़कर एक गाण्यांवर अत्यंत बहारदार पर्फोर्मँसेस सादर करून प्रेक्षक व पाहुण्यांचे अगदी डोळे दिपवणारे आविष्कार सादर केले.

अगदी सुरुवातीला राष्ट्रगीताने नाट्यगृहाचा पडदा उघडून कार्यक्रमाचा शुभारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आला.

यावेळी अमेरिकेत ४० वर्षांपासून कार्यरत असून हिंदू स्वयं सेवक – अमेरिका येथील अध्यक्ष माननीय श्रीनारायणजी चांडक, महादेव कोंढरे- माजी सभापती , दगडू काका कारंजावणे – कृषी उत्पादन बाजार समिती, अमित कंधारे – पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य, गटनेते जिल्हा परिषद शांताराम इंगवले, युवा नेते राजेंद्र दबडे, मनसे उपविभाग प्रमुख रमेश उभे, मनसे नेते पुणे शहर राजेंद्र वेडेपाटील, माजी सरपंच नांदे सौ निकिता रानवडे, माजी सरपंच भुकूम सौ गौरी भरतवंश, विनोद माझीरे- अध्यक्ष पत्रकार संघ मुळशी, समर्थ वार्ता प्रमुख सौ संध्या माझिरे, संदीप ढमढेरे, योगेश सोनवणे, संस्कार प्रयमरी सकूल च्या संचालिका सौ स्नेहा साठे , नगरसेवक वैभव मुरकुटे, श्री गिरिधर राठी, डॉ.शाम चांडक, डॉ.शाम कुलकर्णी, सुधीर अलकारी तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री राजेंद्रजी बांदल, संचालिका सौ रेखा बांदल , शिवानी बांदल, यशराज बांदल, सौ निर्मल पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

नाट्यगृहाच्या अगदी प्रवेश द्वारापासूनच सर्व मान्यवरांचे अत्यंत उत्साहात व थाटात स्वागत करण्यात आले होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रावीण्य मिळालेल्या विद्यार्थ्याना “स्टूडेंट ऑफ द इयर हा मानाचा किताब देऊन मुकुट , सर्टिफिकेट व ट्रॉफी प्रदान करून सर्व विद्यार्थ्याचे कौतुक करण्यात आले .

यावेळी शाळेतर्फे मान्यवरांना देखील पुष्पगुच्छ व पुणेरी पगडी बहाल करण्यात आली तसेच गीताजयंती निमित्त भगवतगीता देऊन सर्वांना सन्मानीत करण्यात आले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडीत यांनी शाळेचा चढता आलेख त्यांच्या वार्षिक अहवालात सादर करून वर्षभरात राबवलेल्या सर्व उपक्रमांना उजाळा देऊन यात महत्वाचे योगदान असलेल्या संस्थेचे, शिक्षकांचे ,मान्यवरांचे व पालकांचे आभार मानले व दिवसेंदिवस हा आलेख असाच वाढून आता यूनिवर्सिटी कडे वाटचाल असल्याचे नमूद केले.

संस्थेच्या डायरेक्टर शिवानी बांदल यांनी पालकांचे शाळेशी असलेले बंधन यातच सर्व काही आले असे सांगून सूस शाखेच्या विद्यार्थ्यांचे पालकांचे मुख्याध्यापिका , शिक्षक व सर्वांचे मनापासून कौतुक करून आज येथे असणारा प्रत्येक विद्यार्थी मोठाच होणार व या व्यासपीठावर आज बसलेल्या सर्व मान्यवरांचा आदर्श ठेऊन उद्या अनेक मान्यवर या शाखेमधून निर्माण होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.

तसेच खरच लहान लावलेल्या पेरिविंकल च्या रोपट्याचे वटवृक्षात्त रूपांतर होत असताना बघून खूप अभिमान वाटतो व सर्व शिक्षक व विद्यार्थी हे कलागुण असलेले आहेत हे सर्वांच्या सादरीकरण याच्यातून दिसून आले असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे श्री नारायणजी चांडक यांनी केले व हा चढता आलेख असाच अजून वर चढू देत असे सांगून पेरीविंकल येथील विद्यार्थी केवळ अभ्यासतच नव्हे सादरीकरण, संस्कृती, कला , नृत्य आदी सर्वगुणांनी संपन्न आहेत व असा नेत्रदीपक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करणे हे खरोखरच थक्क करणारे आहे असे सांगितले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र बांदल, संचालिका सौ रेखा बांदल, शिवानी बांदल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका नेहा माळवदे ,सचिन खोडके, स्मिता श्रीवास्तव, इव्हेंट हेड योगिता धाने यांच्या नेतृत्वाने कोरिओग्राफर शिवप्रसाद पुजारी , कला शिक्षक शिवराज कदम, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने अत्यंत शिस्तबद्ध पध्तीने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौं. प्रफुल्ला पाटील व इयत्ता ३ री ते ११वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाची सांगता गरजा महाराष्ट्र माझा या राज्य गीताने करण्यात आली.