बालेवाडी :
दसरा चौक, बालेवाडी येथे आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात महापडी पूजा महोत्सव मोठ्या श्रद्धेने संपन्न झाला. दक्षिण भारतीय बांधवांच्या पारंपरिक पद्धतीनुसार पूजा, मंत्रोच्चार आणि दीपाराधना करण्यात आली.
रामानाईया गुरु स्वामी, वेणू गोपाल रेड्डी गुरु स्वामी आणि किरण रेड्डी स्वामी यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडली. भगवान अय्यप्पांच्या चरणी आरोग्य, समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी मनःपूर्वक प्रार्थना करण्यात आली.
या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात राहुल बालवडकर (उपाध्यक्ष, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस) यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साहवर्धक आणि मंगलमय रूप प्राप्त झाले. आयोजकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी