March 18, 2026

Samrajya Ladha

Ladha Sarva Samanyansathi

पेरीविंकल चे हुशार विद्यार्थी व पालकांची विश्वासहर्ता यामुळे युनिव्हर्सिटीकडे वाटचाल – बॅरिस्टर रविंद्र लगाडे

चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बावधनचा भव्य वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न!!!

कोथरूड :

चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, बावधन यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आज दि. 1 डिसेंबर 2025 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचे अप्रतिम प्रदर्शन आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभाशीर्वादांनी कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. कार्यक्रमाचा प्रारंभ पारंपरिक सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

कार्यक्रमासाठी बॅरिस्टर रवींद्र लगाडे, दिलीप वेडे पाटील (माजी नगरसेवक), अल्पना वर्पे (मा. नगरसेविका), श्रद्धा प्रभुणे (मा. नगरसेविका), राजाभाऊ गोरडे (माजी नगरसेवक), कुणाल वेडे (पाटील) युवा नेते (NCP), बाळासाहेब भांडे उपनेते (शिवसेना), सुरेशभाऊ हुलावळे ज्येष्ठ नेते (भाजपा), सूर्यकांत भुंडे युवा नेते (NCP), अभिजीत दगडे युवा नेते, नवनाथ पारखी युवा नेते (भाजपा), सुजित भुंडे, मिलिंद जांभुळकर, श्याम उकीडवे, गोरख दगडे (अध्यक्ष, पुणे जिल्हा व्यापारी आघाडी), धनंजय दगडे (अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र क्रीडा आघाडी), वैभव मुरकुटे (स्वीकृत नगरसेवक), सुरेंद्र कंधारे, सचिन मोरे, उमेश कांबळे, योगेश सोनवणे आणि संचालक संदीप ढमढेरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र बांदल, डायरेक्टर सौ. रेखा बांदल, कु. शिवानी बांदल, यश बांदल तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरला.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध सांस्कृतिक नृत्ये, नाटिका, देशभक्तिपर सादरीकरणे आणि सामाजिक संदेश देणारे प्रयोग प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे ठरले. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या गीताला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘एकदा आणखी’ अशी दाद देऊन सादरीकरण पुन्हा रंगमंचावर अनुभवले.

त्याचबरोबर देशभक्तिपर गीतांनी सभागृहात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित केली. ‘हिरण्यकश्यप आणि भक्त प्रह्लाद’ तसेच ‘नरसिंह अवतार’ या नाट्य-नृत्य प्रयोगातील प्रभावी सादरीकरणाने प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांच्या वेशभूषा, साउंड इफेक्ट्स, मंचसज्जा आणि अभिनयाने कार्यक्रमाची दर्जात्मक उंची आणखी वाढवली.

सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उत्कृष्ट आयोजन, शिस्तबद्ध नियोजन आणि विद्यार्थ्यांचे अप्रतिम प्रदर्शन याबद्दल चेअरमन, डायरेक्टर आणि प्राचार्या सौ. निर्मल पंडित यांनी शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पालकांनीही कार्यक्रमाबद्दल कौतुकाचे उद्गार काढत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल व निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका सायली गायकवाड व शिरीन काझी तसेच प्रोग्राम को- ऑर्डिनेटर स्वाती कोल्हे यांच्या सहकार्याने तसेच सर्व शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहाने व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाला . संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी व सायली गायकवाड आणि ऋचा हल्लूर यांनी केले.