पुणे :
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबूरावजी घोलप महाविद्यालय, सांगवी-पुणे २७ येथील दोन खेळाडूंनी जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५’ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
महाविद्यालयाच्या क्रीडा विभागातील कु. भक्ती वाडकर हिने स्विमिंग या क्रीडा प्रकारात एकूण ४ पदके (१ रौप्य, ३ कांस्य) पटकावली. तसेच कु. दीक्षा यादव हिनेही स्विमिंगमध्ये उत्तुंग कामगिरी करत एकूण ५ पदके (१ रौप्य, ४ कांस्य) मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला.
बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेहनत, शिस्त आणि संघभावना याच्या आधारे निश्चित यशप्राप्ती करता येते हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
या उत्कृष्ट यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, उपाध्यक्ष मा. श्री. राजेंद्र घाडगे,मानद सचिव मा. ॲड. संदीप कदम, खजिनदार श्री. मोहनराव देशमुख, सहसचिव श्री. एल. एम. पवार, प्रशासन सचिव श्री. ए. एम. जाधव तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे व शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. विद्या पाठारे यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी