पाषाण :
अमोल बालवडकर फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मिशन निर्मल स्वच्छता अभियानाचा आज पाषाण-सुस मेन रोड परिसरात उत्साहात पुढाकार घेत अंमल करण्यात आला. परिसरातील नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम अधिक प्रभावी ठरला.
📍 स्वच्छता झालेली प्रमुख ठिकाणे:
श्री तेज अपार्टमेंट, लेण्याद्री सोसायटी, बिगिनर्स वर्ल्ड प्री-स्कूल अँड डे केअर, श्री लेण्याद्री हाऊसिंग सोसायटी, विनायक बंगला, महाराजा फर्निचर डेकोर, ए टू झेड कार केअर, इस्राक कार केअर, भाजपा कार्यालय (रोहन रोहिदास कोकाटे), धनश्री फर्निचर मॉल, शिवांजली रेस्टॉरंट अँड बार, चापाजी बुवा मित्र मंडळ, मॉन्टव्हर्ट आर्केड, शैलजा, चंद्रवर्षा, शुभतेज गार्डन मंगल कार्यालय, कोने आणि आसपासची अनेक ठिकाणे.
या संपूर्ण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलन, रस्ते व परिसर स्वच्छता, जाळे-नाले स्वच्छता अशा विविध स्वच्छता उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली.
नागरिक, स्थानिक कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनीही उत्स्फूर्त सहभाग देत स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
🔹 बाणेर, बालेवाडी आणि महाळुंगे येथे उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर ‘मिशन निर्मल’ आता पाषाण परिसरात देखील जोमात सुरू असून नागरिकांचा मोठा पाठिंबा व सहकार्य लाभत आहे.
या अभियानामुळे परिसरात स्वच्छतेबाबत जागरूकता वाढत असून पाषाण-सुस भागात स्वच्छ, निरोगी आणि सुंदर वातावरण निर्माण करण्याचा संकल्प मजबूत होत आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी