बाणेर :
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या क्रांतीशील विचारसरणीचा बहुआयामी परिचय करून देणाऱ्या ‘सावरकर विचारदर्शन’ ग्रंथसंचाच्या प्रकाशनपूर्व योजनेचे लोकार्पण आणि सुप्रसिद्ध अभिनेते – व्याख्याते शरद पोंक्षे यांचे जाहीर व्याख्यान आज शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता बाणेर येथील बंटारा भवनात आयोजित करण्यात आले आहे.
हर घर सावरकर समिती – महाराष्ट्र राज्य आणि लहू बालवडकर सोशल वेलफेअर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा भव्य वैचारिक सोहळा पार पडणार असून, नागरिकांसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे.
या कार्यक्रमात शरद पोंक्षे ‘हिंदुराष्ट्र प्रेरक कालातीत सावरकर’ या विषयावर प्रभावी व्याख्यान देणार असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू व या ग्रंथसंचाचे संपादक मा. सात्यकी सावरकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमात ‘सावरकर विचारदर्शन’ ग्रंथसंचाची प्रकाशनपूर्व नोंदणी विशेष सवलतीत करण्यात येणार आहे. ‘सकाळ प्रकाशन’ निर्मित या ग्रंथसंचामध्ये सावरकरांच्या विचारांचे चार स्वतंत्र पण परस्परपूरक अध्याय समाविष्ट आहेत.
1. हिंदुत्वनिष्ठ सावरकर
2. साहित्यिक सावरकर
3. भाषाभिमानी सावरकर
4. विज्ञाननिष्ठ सावरकर
या ग्रंथसंचाची संकल्पना मा. देवव्रत बापट, अध्यक्ष – हर घर सावरकर समिती यांनी मांडली असून, प्रकल्पाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा. मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कार्यक्रमाला मा. आबासाहेब कांबळे, हर घर सावरकर समिती – महाराष्ट्र राज्य आणि मा. संजय वाघुळदे, विद्यापीठ भाग कार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमासाठी आवश्यक माहीती खालील फोन नंबरवर उपलब्ध आहेत:
📞 9371990077 / 8380990077
या प्रसंगी लहू बालवडकर सोशल वेलफेअर संस्थेतर्फे मोठ्या संख्येने ग्रंथसंचाची प्रकाशनपूर्व नोंदणी करून लोकार्पण करण्यात येणार असून, पुणेकरांनी या वैचारिक सोहळ्याला उपस्थित राहून सावरकर विचारविश्वाच्या सखोल दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लहू गजानन बालवडकर यांनी केले आहे.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी