सुतारवाडीतील धोकादायक ड्रेनेज समस्येवर तातडीने दुरुस्ती होणार, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा यांचे आदेश – स्नेहल सुतार यांच्या पाठपुराव्याला यश
सुतारवाडी, पाषाण – शिवनगर परिसरातील ड्रेनेज लाईन गेल्या काही दिवसांपासून फुटून रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा आरोग्यधोका निर्माण झाला होता. सांडपाण्यामुळे रस्त्यावर घाण, दुर्गंधी वाढून लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत होता, तसेच पादचाऱ्यांना दररोज प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत होता.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत भाजपा नेत्या स्नेहल सचिन सुतार (महाडीक), संपर्क प्रमुख – भाजपा महिला मोर्चा, यांनी तातडीने कॅबिनेट मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे ड्रेनेज दुरुस्तीची मागणी केली. विषयाचे गांभीर्य ओळखून दादांनी पुणे महानगरपालिकेला त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
महापालिकेच्या सहकार्याने ड्रेनेज लाईन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सांडपाणी वाहत असल्याने निर्माण झालेल्या आरोग्यधोक्यापासून आणि दुर्गंधीपासून आता नागरिकांना मुक्ती मिळणार आहे.
स्थानिक नागरिकांनी तातडीने समस्येवर उपाययोजना केल्याबद्दल स्नेहल सुतार (महाडीक) आणि चंद्रकांत दादा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.



More Stories
बालेवाडीत कचरा समस्येवर मोरेश्वर बालवडकर यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन; १५ दिवसांत उपाय न झाल्यास आंदोलनाचा इशारा
नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीचा मेणबत्ती मोर्चा
गायनातून भाव व्यक्त होणे अत्यावश्यक : पं. उपेंद्र भट सोमेश्वर फाउंडेशनतर्फे २४ व्या ‘पुणे आयडॉल- 2026’ स्पर्धेचे उद्घाटन