बालेवाडी :
राहुलदादा बालवडकर सोशल फाउंडेशन, मानवतावादी आरोग्य क्षेत्रात कार्यरत रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया, पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आज अत्यंत यशस्वीपणे पार पडले.
२१ नोव्हेंबर २०२५ रोजी बालेवाडीतील दसरा चौक येथे आयोजित या उपक्रमात हृदयरोग, मेंदू-मज्जातंतू, हाडांचे आजार, नाक-कान-घसा, त्वचारोग, स्त्रीरोग, बालरोग आणि नेत्र तपासणी अशा विविध तज्ञ विभागांचे डॉक्टर नागरिकांना मोफत तपासणी व मार्गदर्शन देण्यासाठी उपस्थित होते. शेकडो लोकांनी या सेवांचा लाभ घेतला.
याच कार्यक्रमात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने पुढाकार घेत मोठ्या संख्येने रक्तदान केले. संकलित रक्त संबंधित रक्तपेढ्यांमार्फत गरजू रुग्णांना पुरविण्यात येणार आहे. नागरिकांसाठी नोंदणी, व्यवस्थापन आणि स्वयंसेवकांची तत्पर सेवा यामुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीत, शिस्तबद्ध आणि यशस्वी पार पडला.
या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. श्री राहुलदादा उत्तम बालवडकर (उपाध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे शहर) यांनी, “नागरिकांचे आरोग्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या शिबिराला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे,” असे सांगितले.
सौ. ज्योतीताई राहुल बालवडकर यांनी महिलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगत पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचे आश्वासन दिले.
स्थानिक रहिवाशांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी