पुणे :
औंध रोड, बोपोडी आणि खडकी स्टेशन परिसरातील वाढत्या व बेकायदेशीर वाहतूक समस्यांमुळे नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. योग्य नियोजनाअभावी हा मार्ग भविष्यात ‘अपघातप्रवण झोन’ ठरू शकतो, अशी गंभीर शक्यता व्यक्त करत प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी वाहतूक विभागाकडे निवेदन सादर केले.
आज अतिरिक्त पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांची भेट घेऊन माने यांनी परिसरातील वाहतूक कोंडी, असुरक्षित रस्ते व अपुऱ्या सुविधांबाबत सविस्तर अहवाल दिला. समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन देत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निर्देश जारी केले.
याच आशयाचे पत्र महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनाही सोमवारी देण्यात आले असून त्यांनीही आवश्यक ती पावले उचलण्याबाबत कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
माने यांनी केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे—
1️⃣ चंद्रमणी नगर ते खडकी स्टेशनपर्यंत नवीन रस्ता तयार करणे.
2️⃣ पाटील कॉम्प्लेक्ससमोर सुरक्षित रस्ता ओलांडण्याची सोय, बॅरिकेटिंग व दोन्ही बाजूंना स्पीडब्रेकर.
3️⃣ गणेश मंदिर परिसरात तातडीने स्पीडब्रेकरची उभारणी.
4️⃣ औंध रोड–सांगवी नवीन पुलासाठी ॲप्रोच रस्ता तयार करणे.
5️⃣ खडकी रेल्वे स्टेशन परिसरातील दुरुस्ती, सुसज्ज पार्किंग व सिग्नल व्यवस्था.
6️⃣ रेल्वे स्टेशनचे नवीन गेट केवळ शंकर मंदिरासमोरील बाजूने सुरू करून तेथेच पार्किंग व्यवस्था करणे.
या सर्व मागण्यांचा उद्देश स्थानिकांचा प्रवास सुरळीत व सुरक्षित करणे आणि वाहतूक कोंडी रोखणे हा असल्याचे माने यांनी सांगितले.
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे संघटक श्री. शेलार सर उपस्थित होते.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी