पाषाण :
पाषाण, सुतारवाडी, बाणेर, बालेवाडी तसेच सुस–महालुंगे परिसरातील नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत मा. राहुलदादा उत्तम बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘फुल ऑन हवा येऊ द्या’ आणि अवधूत यांच्या गाण्यांचा संगीत सोहळा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमात कॉमेडीची धमाल, सुरेल संगीत आणि आकर्षक लकी ड्रॉ यामुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. नागरिकांनी या मनोरंजनाचा मनमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. त्यात माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव आप्पा चांदेरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील भाऊ चांदेरे, माजी नगरसेवक प्रमोदआण्णा निम्हण, माजी नगरसेविका रोहिणीताई चिमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर युवक अध्यक्ष समीरभाऊ चांदेरे, माजी स्वीकृत नगरसेवक बालमतात्या सुतार तसेच विविध परिसरातील नागरिक मित्र परिवार यांचा समावेश होता.
माजी स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव आप्पा चांदेरे यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत राहुलदादांचे अभिनंदन केले आणि सांगितले की, “अशा उपक्रमांमुळे परिसरातील एकता आणि सकारात्मक वातावरण अधिक मजबूत होते. पुढेही अशा उपक्रमांमध्ये आम्ही एकत्र काम करू.” त्यांच्या या भावनांचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.
कार्यक्रमानंतर राहुलदादा बालवडकर यांनी सर्व मान्यवर व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानत, “आपल्या उपस्थितीने हा कार्यक्रम खास आणि संस्मरणीय बनला,” असे सांगितले.
नागरिकांनीही कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत आगामी काळातही अशा सांस्कृतिक उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी