पाषाण :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्रमांक ९ तर्फे मा. श्री. राहुलदादा उत्तम बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त पाषाण परिसरात भव्य आणि रंगतदार मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात प्रेक्षकांसाठी ‘कॉमेडीची धमाल – फुल ऑन हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाची विशेष सादरीकरण होणार आहेत. यासोबतच सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांचा सुरेल आणि मनमोहक संगीत कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
📅 दिनांक: 21 नोव्हेंबर 2025 (शुक्रवार)
⏰ वेळ: सायंकाळी 5.30 वाजता
📍 स्थळ: ITI ग्राऊंड, योग भवन, साई चौक, पाषाण, पुणे
परिसरातील नागरिकांसाठी हा कार्यक्रम मोफत असून महिलांसह पुरुषांसाठी आकर्षक लक्की ड्रॉ चे आयोजन देखील करण्यात आले आहे. प्रभागातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रमैत्रिणींंसह उपस्थित राहून हास्य, मनोरंजन आणि संगीताची मेजवानी घ्यावी, असे आवाहन आयोजक पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल बालवडकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सौ. ज्योतीताई राहुल बालवडकर आणि मा. श्री. राहुलदादा उत्तम बालवडकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी