महाळुंगे (पाडाळे) :
महाळुंगे (पाडाळे) येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात अखंड हरीनाम सप्ताहाचा समाप्ती सोहळा मोठ्या श्रद्धा-भक्तीने संपन्न झाला. श्री विठ्ठल-रुक्मिणी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि साईबाबा यांच्या मूर्ती वर्धापन दिनानिमित्त तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा पवित्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या धार्मिक सोहळ्यास भक्तिभावाने प्रेरित होत एकूण ₹5,78,000 इतकी देणगी चिव्हे परिवाराच्या वतीने प्रियांका विनायक चिव्हे यांनी समर्पित केली.
कार्यक्रमास भोर–राजगड–मुळशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. शंकर भाऊ मांडेकर यांनी उपस्थित राहून आशीर्वचन दिली. संपूर्ण महाळुंगे परिसरात हरीनामाचा गजर, कीर्तन, प्रवचने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण निर्माण केले.
“भक्ती, श्रद्धा आणि संस्कृती यांनी सजलेल्या या सोहळ्याचा भाग होणे हा आम्हा चिव्हे कुटुंबासाठी मोठा सन्मान आहे. हरीनामाचा गजर गावोगावी अखंड सुरू राहो,” अशी भावना प्रियांका विनायक चिव्हे (सदस्या भाजपा, BE Civil) यांनी व्यक्त केली.
सोहळ्यातील सामूहिक सहभाग, हार्दिक भक्तीभाव आणि विठ्ठलाशी जोडलेली आध्यात्मिक एकात्मता यामुळे महाळुंगे (पाडाळे) गावात आनंद, उत्साह आणि समाधानाचे वातावरण पसरले.



More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी