बालेवाडी :
बालेवाडी येथील राहुलदादा बालवडकर सोशल फाउंडेशन यांच्या वतीने विविध तज्ञ डॉक्टर्सच्या उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे आणि सर्वसामान्य नागरिकांना योग्य वैद्यकीय सल्ला मिळावा, या उदात्त हेतूने ही उपक्रममालिका राबविण्यात येत आहे.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे—
🔹 हृदयरोग
🔹 मेंदू व मनका तपासणी
🔹 हाडांची तपासणी
🔹 नाक-कान-घसा तपासणी
🔹 त्वचारोग
🔹 स्त्रीरोग
🔹 बालरोग
🔹 नेत्र तपासणी
अशा विविध आजारांचे तज्ञ डॉक्टर्स मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
शिबिरामध्ये मिळणाऱ्या सेवा अधिक प्रभावी व्हाव्यात याकरिता पद्मश्री डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज, रेड स्वस्तिक सोसायटी, महाराष्ट्र डेव्हलपमेंट फाउंडेशन यांचा विशेष सहकार्य लाभला आहे.
🗓 दिनांक : 21 नोव्हेंबर 2025
⏰ वेळ : सकाळी 10 ते सायं 5
📍 स्थळ : राहुलदादा बालवडकर जनसंपर्क कार्यालय, दसरा चौक, बालेवाडी
समाजसेविका सौ. ज्योतीताई राहुल बालवडकर व राहुलदादा उत्तम बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, अधिकाधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याने या उपक्रमाला नागरिकांचा मोठा सहभाग लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


More Stories
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विद्यार्थ्यांचा भक्ती, संस्कार आणि एकजुटीचा अनोखा संगम; पेरिविंकलचा सर्वाधिक सहभाग ठरला विशेष आकर्षण!
*पेरीविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स मध्ये संस्कृतीचे रंग, भक्तीचा गंध अन् कल्पकतेची उधळण; पेरीविंकलमध्ये गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात!!!*
रस्ते जीवघेणे, प्रशासन बेजबाबदार; सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हा! म्हाळुंगे – नांदे रस्त्यासह इतर ठिकाणी अपघातग्रस्तांसाठी ठोस भरपाई धोरणाची अमोल बालवडकर यांची मागणी